महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ३ लाखांहून अधिक
वनराई बंधारे बांधले जातात.

जलसंवर्धनासाठी वनराई बंधाऱ्याचे सोपे,
स्वस्त व विश्वासार्ह तंत्र वनराईने विकसित केले आहे.

- पद्मविभूषण डॉ.मोहन धारिया
  संस्थापक, वनराई

"वनराई ही केवळ संस्था नाही,
तर भारतभूमीला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम
बनविण्यासाठीचे जनआंदोलन आहे!"

जलसंवर्धन पंचायत - एक लोकचळवळ

महाराष्ट्रामध्ये वारंवार पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्र्वभूमीवर २०१६ मध्ये ‘वनराई’ने ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या संयुक्त सहकार्याने ‘जलसंवर्धन पंचायत – एक लोकचळवळ’ हे अभियान हाती घेतले.

अधिक जाणून घ्या

प्लास्टिक कचरा व ई-कचरा व्यवस्थापन

घातक विषारी घटक उत्सर्जित करणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याला व ई-कचऱ्याला कचराकुंड्यांऐवजी व डम्पिंग ग्राउंडऐवजी प्रक्रिया उद्योगांच्या दिशेने वळविण्याचा हा उपक्रम आहे.

अधिक जाणून घ्या

हरित वारी - पालखी मार्गावर वृक्षलागवड

आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर या पालखीमार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना सावली मिळावी, तसेच हा मार्ग प्रदूषणरहित व सदाहरित राहावा यासाठी ‘हरितवारी’ ही वृक्षलागवडीची मोहीम राबवण्यात येत आहे.

अधिक जाणून घ्या

वनराई मासिक

वनराई मासिकाचे सभासद व्हा

शेती, जल-मृदा संवर्धन, वनीकरण, पर्यावरण व ग्राम विकास समर्पित ‘वनराई’ हे एक अग्रगण्य मराठी मासिक आहे. नामवंत अभ्यासक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ, ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत यांसह संवेदनशील तरुण, संशोधक ‘वनराई’ अंकासाठी नियमित लेखन करतात.  

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाचक असलेल्या या मासिकाला प्रगत शेतकरी, सामाजिक-पर्यावरणवादी कार्यकर्ते, अभ्यासू नेते, प्रशासक व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी यांच्यापासून ते संशोधन-प्रशिक्षण संस्था, विद्यापीठ-महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालय पातळीवर विलक्षण प्रतिसाद मिळत आहे. ‘इंटरनॅशनल स्टँडर्ड सीरिअल नंबर’प्राप्त (ISSN 2250-1215) ‘वनराई’ मासिकाचे सभासद, लेखक, जाहिरातदार, प्रायोजक होण्यासाठी संपर्क साधा.

मासिक मिळवा

CSR

उद्योगांची सामाजिक जबाबदारी

‘उद्योगांची सामाजिक जबाबदारी (CSR) कायदा’ अस्तित्वात येण्याच्या आधीपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी ‘वनराई’ने उद्योग क्षेत्राला प्रेरित केले आहे आणि त्यांच्या सहकार्यातून आजवर अनेक प्रकल्प राबवले आहेत. उद्योगांचे अर्थसहाय्य, लोकसहभाग व शासकीय योजना या तिन्हींची सांगड घालून विविध गावांमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे.

पर्यावरण संवर्धन आणि शाश्र्वत ग्रामीण विकासाचे निरनिराळे प्रकल्प राबवून भारताला स्वच्छ, हरित व समृद्ध बनविण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. ‘उद्योगांची सामाजिक जबाबदारी’ (CSR) प्रकल्पाद्वारे आमच्या या प्रयत्नांशी जोडून घ्या. देशाच्या शाश्वत, सर्वसमावेशक व संतुलित विकासासाठी आपला हातभार लावा!

हातभार लावा!

महत्त्वपूर्ण योगदान

More Projects
महाराष्ट्रातील विस्तार

विकासप्रक्रियेमध्ये लोकसहभाग, विकेंद्रिकरण, शाश्वतता व सर्वसमावेशकता या घटकांचा अग्रक्रमाने विचार झाला पाहिजे, अशी ‘वनराई’ची कायम आग्रही भूमिका असते. याच भूमिकेतून ‘वनराई’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागात जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर ‘वनराई मित्र मंडळ’ गठीत करण्यात आले आहेत. स्थानिक समस्यांना स्थानिक उपाय शोधण्यासाठी आणि त्या उपायांची लोकसहभागातून अंमलबजावणी करून आपआपल्या परिसराचा शाश्वत व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी ठिकठीकाणचे वनराई मित्रमंडळ कायम दक्ष असतात. वनराईच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली राज्यभरातील वनराई मित्र मंडळ कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून वनराईची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवली जात आहे.

वनराई मित्रमंडळ

स्थानिक समस्यांना स्थानिक उपाय शोधण्यासाठी आणि त्या उपायांची लोकसहभागातून अंमलबजावणी करून शाश्वत विकास साधण्यासाठी ठिकठीकाणचे वनराई मित्रमंडळ कायम दक्ष असतात. वनराईच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली राज्यभरातील ‘वनराई मित्र मंडळ’ कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून ‘वनराई’ची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवली जात आहे.

आपणही आपल्या भागात वनराई मित्र मंडळ सुरु करण्यासाठी पुढाकार घेऊ शकता. जर याआधीच आपल्या परिसरात ‘वनराई मित्र मंडळा’ची स्थापना झालेली असेल, तर त्याच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यामध्ये आपण सक्रीय सहभाग घेऊ शकता.

Recent News

Read All News

गौरवोद्गार

वनराई मासिकाचे सभासद व्हा

Our Successful CSR Collaborations

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...