ग्रामीण भागातील स्वयंसेवी संस्थांचा राष्ट्रीय महासंघ (CNRI)

ग्रामीण भागात कार्यरत असणारया स्वयंसेवी संस्थांना संघटित करण्यासाठी डॉ. मोहन धारिया यांनी 'वनराई'च्या माध्यमातून बरीच मेहनत घेतली आणि ‘Confederation of NGO's of Rural India' (CNRI) या नावाने ग्रामीण भागातील स्वयंसेवी संस्थांचा राष्ट्रीय महासंघ स्थापन केला.
07
Jul

ग्रामीण भागातील स्वयंसेवी संस्थांचा राष्ट्रीय महासंघ (CNRI)

Indian-rural-woman-with-smartphone_mini_mini-e1470772144529

ग्रामीण भागात कार्यरत असणारया स्वयंसेवी संस्थांना संघटित करण्यासाठी डॉ. मोहन धारिया यांनी ‘वनराई’च्या माध्यमातून बरीच मेहनत घेतली आणि ‘Confederation of NGO’s of Rural India’ (CNRI) या नावाने ग्रामीण भागातील स्वयंसेवी संस्थांचा राष्ट्रीय महासंघ स्थापन केला. तळागाळात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे; तसेच सर्व संस्थांमध्ये समन्वय साधणे इत्यादीसाठी या महासंघाने ठोस पावले उचलली. देशाच्या कानाकोपऱ्यातील सात हजारांपेक्षा जास्त संस्था-संघटना या महासंघाच्या सभासद आहेत. देशासाठी आत्मसन्मानाने कार्य करता यावे, यासाठी ग्रामीण भागातील स्वयंसेवी क्षेत्राला महासंघाने एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांसारख्या नेत्यांनी या महासंघाच्या व्यासपीठावरून ग्रामीण भारतातील स्वयंसेवी संस्थांना संबोधित केले आहे. ‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया या महासंघाचे विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.

Leave a Reply

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...