पंढरपूर - स्वच्छता अभियान

आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लाखो वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकत्र जमतात. इतक्या मोठ्या संख्येने जमणाऱ्या वारकऱ्यांकरता कायमस्वरूपी शौचालये बांधणे अशक्यप्राय आहे, म्हणून 'वनराई'ने पंढरपूर वारीदरम्यान स्वच्छता व जनजागृती अभियान सलग आठ वर्षे राबवले.
07
Jul

पंढरपूर – स्वच्छता अभियान

Waari3

आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लाखो वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकत्र जमतात. इतक्या मोठ्या संख्येने जमणाऱ्या वारकऱ्यांकरता कायमस्वरूपी शौचालये बांधणे अशक्यप्राय आहे, म्हणून ‘वनराई’ने पंढरपूर वारीदरम्यान स्वच्छता व जनजागृती अभियान सलग आठ वर्षे राबवले. स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी हस्तपत्रके वारकऱ्यांमध्ये वितरित करणे; स्वच्छता राखण्याचे आवाहन करणारे कापडी फलक ठिकठिकाणी लावणे; शिवाय मानवी मलमूत्र, उष्टे-खरकटे व वाया गेलेले अन्न, खराब झालेली फळे इत्यादींवर ‘विकल्प तंत्रज्ञाना’च्या सहयोगाने ‘एन्व्हायरोमित्र बॅक्टेरिअल कल्चर’ची फवारणी करणे इत्यादी कामे या अभियानाअंतर्गत केली जात असत. या फवारणीमुळे दुर्गंधी पूर्णपणे बंद होत असे. हानिकारक जीवजंतू तसेच माश्या, डास यांचे प्रमाण कमी होऊन सर्व कचऱ्याचे रूपांतर लवकरच उत्कृष्ट अशा कंपोस्ट खतामध्ये होत असे. त्यामुळे रोगराई कमी होण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लागत असे. पंढरपूर यात्रेदरम्यानच्या अपुऱ्या शौचालयव्यवस्थेची आणि अस्वच्छतेची दखल मा.उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर आता शासकीय पातळीवरून या दिशेने सकारात्मक पावले उचलली जात आहेत.

Leave a Reply

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...