पुण्यातील पर्यावरण संवर्धन उपक्रम

‘वनराई’च्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सुमारे १०,००० शालेय विद्यार्थी पर्यावरण संवर्धनासाठी शहरात विविध उपक्रम राबवतात. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता, कचरा-व्यवस्थापन, वृक्षलागवड, जलसंवर्धन इत्यादी उपक्रमांचा समावेश असतो.
07
Jul

पुण्यातील पर्यावरण संवर्धन उपक्रम

1172490541_66708af3ca_z

विविध पर्यावरणप्रेमी संस्थांच्या आणि पुणेकरांच्या सहकार्याने ‘वनराई’ने पुणे शहरातील पर्यावरणाच्या विविध प्रश्नांवर कायम आवाज उठवला. जसे की, वैविध्यपूर्ण दुर्मीळ वनसंपदेने आणि मोठमोठ्या महाकाय वृक्षांनी समृद्ध असलेले पुण्यातील ‘एम्प्रेस गार्डन’ हे रेसकोर्सच्या घोड्यांच्या तबेल्याकरता देण्याचा घाट घातला जात होता. तो उधळून लावून ‘एम्प्रेस गार्डन’ वाचवण्यात ‘वनराई’ची महत्त्वाची भूमिका होती. तसेच पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि जंगली महाराज रस्ता या दोन्ही रस्त्यांलगतची मोठमोठी झाडे तोडण्याचा निर्णय रस्ता-रूंदीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान घेतला जाणार होता. या निर्णयालाही ‘वनराई’ने इतर संस्था-संघटनांसह व नागरिकांसह कडाडून विरोध दर्शवल्याने आजही ती झाडे अस्तित्वात आहेत. एवढेच नव्हे, तर पुण्यातील टेकड्या वाचवण्यात आणि त्या टेकड्यांवर झाडझाडोरा आणि जैवविविधता वाढवण्यात वनराईचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

टेकड्या हे पुणे शहराला ऑक्सिजन पुरवणारे फुप्फुस आहे, तसेच या टेकड्यांमुळे मोठ्या प्रमाणात भूजल पुनर्भरण होते आणि शहरातील विंधनविहिरींचे (कूपनलिकांचे) पाणी टिकून राहते. त्यामुळे शहराच्या पर्यावरण संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या या टेकड्यांना हरितक्षेत्र म्हणून आरक्षित करावे, टेकड्यांवरील बांधकामांना परवानगी देऊ नये इत्यादी मागण्यांसाठी ‘वनराई’ने सतत आग्रही भूमिका घेतली. दि. २३ फेब्रुवारी १९८९ रोजी शहरातील निसर्गप्रेमी संस्था-संघटनांच्या आणि नागरिकांच्या पुढाकारातून या संदर्भात घेतलेल्या सभेतील ठरावांचे वृत्तांकन ‘वनराई’कडे आजही उपलब्ध आहे.

पुणे शहरातील टेकड्यांवर व इतर मोकळ्या जागेत झोपडपट्ट्या आणि अतिक्रमणे वाढू नयेत म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘हरित पुणे प्रकल्प’ राबवला होता. त्या प्रकल्पाची निर्मिती व अंमलबजावणी यांमध्येही ‘वनराई’चे मोठे योगदान होते. या प्रकल्पाअंतर्गत १९९०-९३ या केवळ तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे चार हजार एकर क्षेत्रावर जवळपास तीस लाख झाडे लावण्यात आली, म्हणूनच बहुतांश टेकड्या आज हिरव्यागार दिसत आहेत आणि त्या ठिकाणी फुलपाखरे, ससे, मोर यांच्या वावरासह वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधताही दृष्टीस पडत आहे.

पुणे शहरातील टेकड्यांवर किमान चार टक्के बांधकामाला परवानगी मिळावी, याबाबत २०१२मध्ये निर्णय घेतला जात होता. मात्र या चार टक्के बांधकामातून निर्माण होणाऱ्या इमारतींना विद्युतजोडणी, पाणीपुरवठा, सांडपाणीव्यवस्था व रस्ते इत्यादी सोयीसुविधा पुरवण्यासाठी टेकडया आणखी पोखरल्या जातील. अशी ‘वनराई’सह इतर पर्यावरणप्रेमी संस्था-संघटनांची धारणा होती, म्हणून सर्वांनी मिळून या निर्णयाला तीव्र विरोध केला. हा असा निर्णय घेऊ नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना ‘वनराई’च्या माध्यमातून पत्रव्यवहार करून हा निर्णय थांबवण्यात आला.

‘वनराई’च्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सुमारे १०,००० शालेय विद्यार्थी पर्यावरण संवर्धनासाठी शहरात विविध उपक्रम राबवतात. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता, कचरा-व्यवस्थापन, वृक्षलागवड, जलसंवर्धन इत्यादी उपक्रमांचा समावेश असतो.

Leave a Reply

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...