महिला सक्षमीकरण

‘वनराई’ने विविध गावांमध्ये सुरू केलेल्या बचतगटांच्या चळवळीमुळे सुमारे पाच हजारांहून अधिक ग्रामीण महिलांच्या व्यक्तिमत्त्वांचा विकास होऊन त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
07
Jul

महिला सक्षमीकरण

person-690245_960_720

‘वनराई’ने विविध गावांमध्ये सुरू केलेल्या बचतगटांच्या चळवळीमुळे सुमारे पाच हजारांहून अधिक ग्रामीण महिलांच्या व्यक्तिमत्त्वांचा विकास होऊन त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या बचतगटांतील महिलांचा विशेष भर आपल्या मुलामुलींना चांगले शिक्षण देण्यावर आणि त्यांच्यावर स्वच्छतेचे, नैतिक मूल्यांचे व पर्यावरणाचे संस्कार रुजवण्यावर आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून गावांमध्ये सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडून आणण्यासाठी ‘वनराई’ प्रयत्नशील आहे.

‘वनराई’च्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील गोकवडी गावातील महिलांनी गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे, तर जालना जिल्ह्यातील बाजारवाहेगाव येथील महिलांनी शेवई मशीन यंत्र व डाळ मिल यांच्याद्वारे आपल्या व्यवसायाची उभारणी केली आहे. आय.टी.सी. ब्रँडच्या अगरबत्तीसाठी कच्चा माल पुरवण्याचे काम ‘वनराई’च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील बाभूळसर गावातील महिलांनी केले आहे. नाशिक जिल्ह्यातील मुळेगाव येथील आदिवासी महिला बचतगटाने शेळीपालनाला व कोंबडीपालनाला व्यवसाय म्हणून स्वीकारले आहे. वनराईच्या मार्गदर्शनातून व सहकार्यातून असे कितीतरी छोटेमोठे उद्योग ठिकठिकाणचे महिला बचतगट करत आहेत.

Leave a Reply

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...