अभिनव उपक्रम

अभिनव उपक्रम

वनराई बंधारे

     ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले साहित्य वापरून पाणी अडवण्या-मुरवण्यासाठी वनराई संस्थेने ‘वनराई बंधारया’ची संकल्पना विकसित केली आहे. पावसाळ्यानंतर जेव्हा नदी-नाल्यांतील पाण्याच्या प्रवाहाची गती कमी असते, तेव्हा वनराई बंधारे बांधावे लागतात. वनराई बंधाऱ्यामुळे घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते; तसेच आजूबाजूच्या विहिरींमधल्या व विंधनविहिरींमधल्या पाण्याची आणि भूजलाची पातळी वाढते. वनराई बंधारे दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.            नदीनाल्याच्या किंवा ओढ्याच्या पात्रात वनराई बंधारा बांधताना तेथेच उपलब्ध असणारी माती, खडे, वाळू इत्यादी राडारोडा सिमेंटच्या किंवा खताच्या रिकाम्या पोत्यामध्ये भरला जातो आणि त्या पोत्यांचे तोंड नायलॉनच्या दोरीने शिवले जाते. अशा प्रकारे साधारणपणे अर्ध्यापेक्षा थोडे जास्त पोते भरून ती पोती व्यवस्थितरीत्या नदीनाल्याच्या पात्रात एकावर एक सांधामोड पद्धतीने रचून लोकसहभागातून व श्रमदानातून बंधारा बांधणे यालाच वनराई बंधारा म्हणतात. हे अत्यंत सोपे, किफायतशीर व स्वस्त तंत्रज्ञान आहे.

     रोजगार हमी योजनेतून, लोकसहभागातून व श्रमदानातून महाराष्ट्रात दरवर्षी तीन लाखांहून अधिक वनराई बंधारे बांधले जातात. यातून महाराष्ट्रात वनराई बंधाऱ्यांची जणू चळवळच उभी राहिली आहे. यवतमाळ जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी वनराई बंधारे बांधण्याच्या चळवळीतील शालेय विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाची नोंद ‘युनिसेफ’ या जागतिक संघटनेने घेऊन त्यासंबंधीचा तपशील त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला होता. वनराई बंधाऱ्यांचे तंत्रज्ञान आता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांनीसुद्धा मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये ही चळवळ सुरू केली होती. त्या ठिकाणी वनराई बंधाऱ्यांच्या धर्तीवर साखळी पद्धतीने लाखोंच्या संख्येने ‘बोरी बांध’ बांधण्यात आले होते.

पाणलोट उद्यान

     विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ, कार्यकर्ते यांना पाणलोट व्यवस्थापनाचे शास्त्र आणि तंत्र समजावे यासाठी वनराईने ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी’ यांच्या संयुक्त सहकार्याने पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या आवारात ‘पाणलोट उद्यान’ उभारले आहे. या ‘पाणलोट उद्याना’मध्ये वनराई बंधारा, अनघड दगडी बंधारा, सलग समतल चर, गेबियन बंधारा, माती नालाबंधारा, सिमेंट नालाबंधारा, वळण बंधारा, कोल्हापुरी बंधारा; तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धती अशा विविध प्रकारच्या प्रतिकृतींच (मॉडेल्सची) उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब कशा प्रकारे अडवावा आणि जमिनीत मुरवावा याबाबतचे लोकशिक्षण होत आहे.

     डोंगरमाथ्यावर पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी पायथ्यापर्यंत कसे वाहत येते, या पाण्याला पाणलोट व्यवस्थापनाच्या ‘माथा ते पायथा’ या उपचार पद्धतीनुसार कुठे-कुठे आणि कशा-कशा प्रकारे अटकाव घालता येऊ शकतो; अटकाव घातल्यानंतर पाणी कुठे आणि कसे मुरते; मुरलेले पाणी विहिरींद्वारे आणि विंधनविहिरींद्वारे कसे प्राप्त होते; या पाण्याच्या उपलब्धतेतून सूक्ष्म सिंचनाच्या साहाय्याने अधिकाधिक शेतीक्षेत्र लागवडीखाली कसे आणता येऊ शकते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पाणलोट उद्यानातील जिवंत देखाव्यांमध्ये पाहायला मिळतात.  

     शेतकी महाविद्यालयात व पुण्यातील विविध शाळा-महाविद्यालयांत शिकणारे विद्यार्थी, शेतकरी व पर्यटक या सर्वांसाठी हे एक प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आणि शहराचे वैभव ठरले आहे.

वनराई सायकल पंप

     मॉडर्न टेक्निकल सेंटरचे संचालक चंद्रकांत पाठक यांनी वनराईच्या सहकार्याने पर्यावरणस्नेही ‘वनराई सायकल पंप’ विकसित केला आहे. इंधन किंवा विद्युत उर्जेची गरज नसणाऱ्या आणि प्रदूषण न करणाऱ्या या पंपाची सोळा फूट खोलीचे पाणी उपसण्याची आणि २५ फुट उंचीवर पाणी नेण्याची क्षमता आहे.

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...