सल्लागार मंडळ

Dr Raghunath Mashelkar

डॉ. रघुनाथ माशेलकर (अध्यक्ष)

डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ असून, ‘ग्लोबल रीसर्च अलायन्स’चे ते अध्यक्ष आहेत. ग्लोबल रीसर्च अलायन्स हे एशिया-पॅसिफिक, युरोप आणि अमेरिका येथील सार्वजनिक निधींवर चालणार्‍या संशोधन आणि विकास संस्थांचे जाळे असून, त्यात ६० हजारहून अधिक वैज्ञानिकांचा सहभाग आहे. डॉ. माशेलकर यांनी भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञानविषयक सल्लागार समितीमध्येसुद्धा काम केले आहे. त्यांना ५० हून अधिक पारितोषिके आणि सन्माननीय डॉक्टरेट्स मिळालेल्या आहेत. विज्ञानविषयक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कित्येक संस्था-संघटना आणि समित्यांचे ते सदस्य आहेत. राष्ट्र उभारणीतील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Jayant Narilkar

डॉ. जयंत नारळीकर

डॉ. जयंत नारळीकर हे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ असून, ते केंब्रिज युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने उभारलेल्या ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’चे (‘आयुका’चे) ते संस्थापक-संचालक राहिले आहेत. शास्त्रीय संशोधनाबरोबरच त्यांनी अतांत्रिक विषयांवर अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत. भारतात आणि परदेशांतही त्यांना कित्येक उच्च पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण, भारत सरकारकडून पद्मभूषण व पद्मविभूषण यांसारख्या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. ‘युनेस्को’ने त्यांचा ‘कलिंग अ‍ॅवॉर्ड’ने गौरव केला आहे.

Dr Madhav Gadgil

डॉ. माधव गाडगीळ

डॉ. माधव गाडगीळ प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांसारखा प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. ‘सायन्स अकॅडेमी ऑफ इंडिया’, ‘थर्ड वर्ल्ड अकॅडेमी ऑफ सायन्स’ आणि ‘यु. एस. नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स’ येथे काम करण्यासाठी त्यांची निवड झाली होती. ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची त्यांनी स्थापना केली आहे. पंतप्रधानांच्या विज्ञानविषयक सल्लागार समितीचे आणि राष्ट्रीय सल्लागार समितीचे ते सदस्य होते. ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी अ‍ॅडव्हायजरी पॅनेल ऑफ ग्लोबल एनव्हारर्नमेंटल फॅसिलिटी’चे त्यांनी अध्यक्षपद भूषवले असून, ‘ब्रिटिश अँड अमेरिकन इकॉलॉजिकल सोसायटीज’चे ते मानद सदस्य आहेत. भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, शांतिस्वरूप भटनागर अ‍ॅवॉर्ड, विक्रम साराभाई अ‍ॅवॉर्ड यांसारख्या अनेक पारितोषिकांनी त्यांचा गौरव झालेला आहे.

Dr Vijay Bhatkar

डॉ. विज भटकर

डॉ. विजय भटकर हे भारतातील नामवंत संगणक शास्त्रज्ञ असून, भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे ते मुख्य प्रवर्तक म्हणून परिचित आहेत. भारताच्या पहिल्या ‘परम’ महासंगणकाचे शिल्पकार, ‘सी-डॅक’चे संस्थापक, कार्यकारी संचालक म्हणून त्यांना ओळखले जाते. ‘सायंटिफिक अ‍ॅडव्हायजरी कमिटी टू कॅबिनेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’चे ते सदस्य होते. याखेरीज महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या ‘ई-शासन समिती’चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आयआयटी- दिल्लीच्या नियमन मंडळाचे ते अध्यक्ष होते. नुकतेच ते नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू झाले आहेत. तसेच भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘स्थानिक गायी आणि त्यांच्यापासून मिळणारया ५ उत्पादनांच्या (‘पंचगव्य’च्या) वैज्ञानिक प्रमाणीकरणाच्या सर्वसमावेशक अभ्यासा’साठी नेमण्यात आलेल्या ‘नॅशनल स्टीअरिंग कमिटी’च्या सहअध्यक्षपदी डॉ. भटकर यांची नियुक्ती केली आहे. विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण, भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मविभूषण आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Ram Takavale

डॉ. राम ताकवले

डॉ. राम ताकवले हे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ असून, त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविले आहे. ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ आणि ‘एशियन असोसिएशन ऑफ ओपन युनिव्हर्सिटीज’चे ते अध्यक्ष होते. ‘उच्च आणि तंत्र शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग’ या विषयावर महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ‘इक्रीसेट’च्या ‘व्हर्चुअल अकॅडेमी फॉर सेमी-एरीड ट्रॉपिक्स’चे (VASAT) आणि कृषी क्षेत्रातील काही विद्यापीठांच्या विस्तार शिक्षण कार्यक्रमांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

Vijay Kelkar

डॉ. विज केळकर

डॉ. विजय केळकर हे नामवंत अर्थतज्ञ असून, त्यांनी १९७३ मध्ये नियोजन आयोगामध्ये (सध्याच्या नीती आयोगात) काम करण्यास सुरुवात केली. १९७७ पासून त्यांनी भारताच्या वाणिज्य मंत्रालयात विविध पदांवर काम केले. त्यामध्ये ‘इकॉनॉमिक अ‍ॅडव्हायजरी कौन्सिल’च्या सचिवपदापासून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समिती सदस्यापर्यंतच्या पदांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचेही (आयएमएफचे) ते कार्यकारी संचालक होते. महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. आर्थिक क्षेत्राच्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. भूषण पटवर्धन

डॉ. भूषण पटवर्धन हे ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या ‘आंतरविद्याशाखीय आरोग्य विज्ञान विभागा’चे प्रमुख आहेत. कित्येक विद्यापीठांच्या संचालक मंडळांवर ते कार्यरत असून विद्यापीठ अनुदान आयोग, वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग, ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ यांसारख्या अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. निर्णयप्रक्रियेत सहभागी असलेल्या कित्येक मंडळांवर त्यांनी काम केले असून, राष्ट्रीय माहिती आयोग आणि भारताचा नियोजन आयोग यांच्या कृती दलांमध्येही त्यांनी काम केले आहे. जागतिक आरोग्य संघटना, जिनेव्हा आणि SEARO यांचे सल्लागार म्हणून डॉ. पटवर्धन यांनी काम केले असून, UN- ESCAP, GRA आणि NIH NCCAM यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांत ते सहभागी झाले आहेत. ‘सिम्बायोसीस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’च्या कुलगुरूपदाचा पदभारही त्यांनी सांभाळलेला आहे.

Dr Pandav

डॉ. चंद्रकांत पांडव

डॉ. चंद्रकांत पांडव हे ‘इंटरनॅशनल कौन्सिल फॉर कंट्रोल ऑफ आयोडिन डेफिशियन्सी डिसऑर्डर्स’ (आयसीसीआयडीडी) ग्लोबल नेटवर्कचे संस्थापक सदस्य आणि या संस्थेचे दक्षिण आशिया विभागीय समन्वयक आहेत. दक्षिण आशिया, पश्‍चिम पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिकन देश अशा एकूण ६० हून अधिक देशांसाठी त्यांनी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनिसेफ (UNICEF) यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे. ‘इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन, तसेच ‘इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन’ या संस्थांचे ते माजी अध्यक्ष आहेत. भारत सरकार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, न्युट्रिशन फाउंडेशन ऑफ इंडिया आणि इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या अनेक तांत्रिक तज्ज्ञ गटांचे ते सध्या सदस्य आहेत. आरोग्य आणि आयोडिन डेफिशियन्सी डिसऑर्डर्स (आयडीडी) यावरच्या कित्येक चित्रपटांचे ते तांत्रिक तज्ज्ञ आहेत. ‘बॅरन हार्वेस्ट’ हा त्यापैकी एक माहितीपट असून त्याला उत्तम माहितीपटाचे राष्ट्रपती सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे. ‘इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊस’कडून त्यांना ‘बेस्ट सिटीझन अ‍ॅवॉर्ड’नेही गौरवण्यात आले आहे.

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...