विश्वस्त मंडळ

Nitin Desai

श्री. नितीन देसाई

श्री. नितीन देसाई हे ‘देसाई ब्रदर्स लिमिटेड’ या उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या उद्योगसमूहामार्फत चालविल्या जाणाऱ्या दहा उद्योगांपैकी ‘मदर्स रेसीपी’ हा देशातील आघाडीचा एक अन्न प्रक्रिया उद्योग आहे. श्री. देसाई हे ‘पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरॉलॉजी’चे संस्थापक अध्यक्ष आहेत, तसेच ते ‘पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन’, ‘एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल’ आणि ‘पुणे न्युरोसायन्सेस ट्रस्ट रीसर्च सोसायटी’ आदी संस्थांचे अध्यक्ष आहेत.

Kamal Morarkar

श्री. कमल मोरारका

श्री. कमल मोरारका यांनी ‘ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशन’, ‘ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज’ आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेन ट्रेड’ या संस्थांचे यशस्वीपणे नेतृत्त्व केले आहे. ग्रामीण विकासाअंतर्गत राजस्थानमधील शेखावती भागातील २५० हून अधिक खेड्यांमध्ये काम करणार्‍या ‘एम.आर. मोरारका-जीडीसी रुरल रिसर्च फाउंडेशन’चे ते अध्यक्ष आहेत.

Girish Gandhi

श्री. गिरीश गांधी

श्री. गिरीश गांधी यांनी विधानसभा सदस्य (आमदार) म्हणून काम केलेले आहे. त्याचबरोबर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’, ‘महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक संघ’ आणि ‘महाराष्ट्र वन विकास महामंडळ’ आदींचे त्यांनी नेतृत्त्व केले आहे. ‘महाराष्ट्र राज्य जलसंवर्धन सल्लागार समिती’चे ते सदस्यही होते. त्यांना इंदिरा गांधी पुरस्कार, ग्लोरी ऑफ इंडिया अ‍ॅवॉर्ड आणि ‘वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान अ‍ॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. ‘वनराई फाउंडेशन’ (नागपूर) आणि ‘अखिल भारतीय हिंदी संस्था संघ’, नवी दिल्लीचेही ते अध्यक्ष आहेत.

Rohidas More

श्री. रोहिदास मोरे

श्री. रोहिदास मोरे हे ‘युनिव्हर्सल कन्स्ट्रक्शन मशिनरी अँड इक्विपमेंट लि.’चे अध्यक्ष आहेत. त्यांना अभियांत्रिकी क्षेत्राचा व्यापक अनुभव असून, त्यांच्या नेतृत्त्वाखाली ‘मेसर्स युनिव्हर्सल’ कंपनीने भारताच्या ‘पृथ्वी क्षेपणास्त्रा’मध्ये वापरला जाणारा ‘नायट्रिक अ‍ॅसिड पंप’ उत्पादित केला आहे. ‘भारत विकास अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘वर्ल्ड क्वालिटी कमिटमेंट गोल्ड कॅटेगरी अ‍ॅवॉर्ड’ यांसह विविध पारितोषिके त्यांना बहाल करण्यात आली आहेत.

Ganpatrao Patil

श्री. गणपतराव पाटील

श्री. गणपतराव पाटील यांनी ‘श्री. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.’, ‘श्रीवर्धन बायोटेक कंपनी’, ‘महाराष्ट्र द्राक्ष बागायत संघ’, ‘वीरशैव को-ऑप. बँक लि.’, कोल्हापूर आणि ‘श्री. दत्त सहकारी शेतीमाल प्रक्रिया संस्था मर्यादित’ यांचे नेतृत्त्व केले आहे. ‘श्रीवर्धन बायोटेक’च्या माध्यमातून त्यांनी देशातील सर्वाधिक मोठ्या पॉलीहाऊसची उभारणी केली आहे. या पॉलीहाऊस शेतीतून त्यांनी रंगीत सिमला मिरची आणि द्राक्षाच्या विक्रमी उत्पादनाचे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. आधुनिक शेतीतील योगदानाबद्दल त्यांना ‘बँक ऑफ इंडिया’कडून ‘उत्कृष्टता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे, तसेच ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’, ‘उद्यान पंडित पुरस्कार’ व महाराष्ट्र शासनाचा ‘महसूल सहकार पुरस्कार’ त्यांना प्राप्त झालेला आहे. याखेरीज दिल्ली येथील ‘मीडिया टुडे ग्रुप’च्या वतीने त्यांना ‘सर्वाधिक फुल उत्पादक’ आणि ‘सर्वोच्च फुल निर्यातदार’ म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे.

Avinash Bosale

श्री. अविनाश भोसले

श्री. अविनाश भोसले हे ‘ए.बी.आय.एल. ग्रुप’ या एका मोठ्या उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. व्यवसायापलीकडच्या नात्यावर या उद्योग समुहाचा विश्वास असल्याने ए.बी.आय.एल. ग्रुपच्या नफ्याचा मुख्य हिस्सा ‘ए.बी.आय.एल. फाउंडेशन’तर्फे सामाजिक उपक्रमांकडे वळवला जातो. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांना आरोग्य, शिक्षण, निवारा इत्यादी सुविधा पुरविणे. बालकांचे संगोपन, स्वच्छता, जनजागृती व शहरांचे सौंदर्यीकरण करणे इत्यादी क्षेत्रामध्ये ‘ए.बी.आय.एल. फाउंडेशन’ कार्यरत आहे. याशिवाय या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकल्याणासाठी पुढाकार घेणार्‍या व्यक्तींचा आणि उभरत्या बुद्धिमत्तेचा सन्मान केला जातो. विविध सामाजिक उपक्रमांना अर्थसहाय्य केले जाते आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये पाठबळ देण्याचेही कार्य केले जाते.

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...