अध्यक्ष

President- Ravindra Dharia
श्री. रवींद्र धारिया (अध्यक्ष)

श्री. रवींद्र धारिया हे ‘क्रिएटीव्ह इंजिनियर्स’ उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या उद्योगाद्वारे जिम आणि व्यायामाशी
निगडित साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात मागील २५ वर्षांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ‘क्रिएटिव्ह इंजिनियर्स’
उद्योगातून आता ‘पहेलवान जिम’ ही नवी संकल्पना आकाराला आली आहे. हार्डकोर जिम्सच्या शृंखलेद्वारे
देशभरातील सर्वसामान्य जनतेला अल्पशा मोबदल्यात जागतिक दर्जाच्या व्यायामाच्या सुविधा उपलब्ध करून
देण्याचा ध्यास ‘पहेलवान जिम’ने घेतला आहे. तसेच ‘पहेलवान जिम प्रशिक्षण अकादमी’च्या माध्यमातून होतकरू
तरुणांमध्ये व्यायाम प्रशिक्षकाची कौशल्ये विकसित करून त्यांना रोजगार-स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचाही
‘पहेलवान जिम’चा मानस आहे.

यशस्वी उद्योजक म्हणून श्री. रवींद्र धारिया परिचित असले तरी त्याहून अधिक ते सामाजिक-पार्यावरणवादी कार्यकर्ते
म्हणून सर्वांना परिचित आहेत. १९९० पासून ते वनराईचे विश्वस्त आहेत. दोन दशकांहून अधिक काळ अतिशय सक्रियपणे व
जबाबदारीने त्यांनी ‘वनराई’च्या संचलनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यांचा हा प्रदीर्घ अनुभव विचारात घेऊन
पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या दुःखद निधनानंतर विश्वस्त मंडळाने एकमताने वनराईच्या अध्यक्षपदाची धुरा श्री. रवींद्र
धारिया यांच्याकडे सोपविली. काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्ये वापरून त्यांनी वनराईच्या माध्यमातून
होणाऱ्या विकासकामांना गती दिली. वनराईच्या कार्याची व्याप्ती वाढविण्यावर आणि विस्तारावर सातत्याने भर दिला.
सामाजिक कामांमध्ये लोकसहभाग घेण्यात, कामाची गुणवत्ता राखण्यात, समाजाप्रती उत्तरदायीत्वाची भावना
जोपासण्यात आणि कामकाजामध्ये पारदर्शकता ठेवण्यासंदर्भात सतत आग्रही भूमिका घेतली.
वनराईच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अवघ्या वर्षभरात पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया
यांच्या स्वप्नातील ‘पाणलोट उद्यान’ पुण्यामध्ये उभे केले. रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मुलन
आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी ‘ग्रामीण उपजीविका’ विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विचारमंथन घडवून आणले. या चर्चासत्रात ‘युनिसेफ’च्या प्रतिनिधींनीसह
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मान्यवर तज्ञांना सहभागी करून घेतले. कोर्पोरेट सोशल रीस्पोन्सिबिलीटीचे धोरण
आणि त्याविषयीचा कायदा यासंदर्भात समाजामध्ये जागरूकता घडवून आणण्यासाठी, तसेच स्वयंसेवी संस्था आणि
कोर्पोरेट विश्व यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी ‘सी.एस.आर. मिट’चे आयोजन केले. तसेच भारतातील शेती आणि
शेतकऱ्यांसमोरील आव्हाने ऐरणीवर आणण्यासाठी शेतकरी नेत्यांची राष्ट्रीय परिषद भरवली. विविध राजकीय पक्षांच्या
आणि निरनिराळ्या विचारधारेच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी एका व्यासपीठावर आणले.

ग्राम विकासाच्या अनुषंगाने एक एक गाव स्वतंत्रपणे विकसित करण्याऐवजी पंचक्रोशीतील गावांच्या
समुहाचा एकत्रितपणे विकास करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. म्हणूनच रायगड, रत्नागिरी व सातारा या
जिल्ह्यांमध्ये या दिशेने वनराईचे ग्राम विकास प्रकल्प सुरु आहेत. महाराष्ट्रातील २०१६ च्या भीषण दुष्काळाच्या
पार्श्वभूमीवर ‘जलसंवर्धन पंचायत – एक लोकचळवळ’ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम श्री. रवींद्र धारिया यांच्या पुढाकारातून
हाती घेण्यात आला. ५ जून २०१७ रोजी महाराष्ट्र शासनद्वारा आयोजित जागतिक पर्यावरण दिनाच्या सोहळ्यामध्ये
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमातील पहिल्या तीन विजेत्या गावांसह श्री.
रवींद्र धारिया यांना सन्मानित करण्यात आले. देशातील प्लास्टिक कचरा व ई-कचऱ्याच्या समस्येवर मात
करण्यासाठी लोकसहभागातून एकमेवाद्वितीय आदर्श व्यवस्था निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच आळंदी
ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या पालखीमार्गावर दुतर्फा वृक्षलागवड करण्याचा उपक्रमही त्यांच्या नेतृत्त्वाखाली
‘वनराई’ने हाती घेतला आहे.

हरियाणातील ‘गुरू जम्भेश्वर युनिव्हर्स्टिी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी’च्या वतीने ‘मधू भसीन स्मृती
पुरस्कार’, ‘साथी किशोर पवार प्रतिष्ठान’च्या वतीने ‘समाजकार्य गौरव पुरस्कार’, तसेच ‘लायन्स क्लब’, ‘रोटरी क्लब’
आणि ‘महाराष्ट्र कला सांस्कृतिक मंच’ या तीनही संस्थांकडून ‘पर्यावरण मित्र पुरस्कार’ असे विविध सन्मान
‘वनराई’च्या कार्याबद्दल त्यांना प्राप्त झाले आहेत.

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...